Thursday, 1 October 2015

प्रगत ? महाराष्ट्र ? होणार ?

                   प्रगत ? महाराष्ट्र ? होणार ?
भाग.1.
       गेल्या काही दिवसापासून शिक्षक मोठ्या प्रमाणात शब्दपट्ट्या,अंक पट्ट्या तयार करणे ,गोट्या गोळा करणे,खडे गोळा करणे,जमिनीवरील फरशी काळी करताना दिसत आहेत.मजेदार गोष्ट म्हणजे अशी शिक्षक झपाट्याने कामाला लागली ज्यांना आपण ‘जुनी खोंड ‘अस संबोधतो.ज्यांनी मुलांना कधी मूल समजलच नाही अन आज मुलांत चक्क अल्लादिन चा जिन दिसत आहे.त्यांची अशी धारणा झाली आहे कि,ज्या संकल्पना टे १० -२०  वर्षात करू शकले नाहीत ते मुलांकडून अत्ता करून घेणारच .
           काही दिवसापूर्वी कुमठे बीटाला शैक्षणिक? भेटीला गेली आणि तेथील गुणवत्ता पाहून भाराहून गेली.व गंगेत स्नान करून आल्या सारखे गुणवत्तेचा नाम जप करू लागली.मित्रानो याला म्हणतात ‘बौद्धिक चेतक बदल’. चेतक हा निरस व क्षणिक कालांतराने  होऊ शकतो. कुमठे बीट जर चेतक गुळगुळीत भाषेत सांगायचे तर गुणवत्तेच मॉडेल असेल तर शैक्षणिक क्रांती असंमभव आहे. कुमठे बीटास मी एक ज्ञानरचानावादी झरा समजतो.
       महाराष्ट्र अप्रगत राहण्याची करणे शोधण्याची ही योग्य वेळ आहे.                   प्रगत ? महाराष्ट्र ? होणार ? च्या पुढील भागात कारणांचा सविस्तर विचार करू या.
                      धन्यवाद ........


        

2 comments:

  1. लई भारी . गुणवत्ता ही फक्त सिझानेबल कार्यक्रमाने साध्य होणार नाही.त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत .भाग २ ची वात पाहतोय.

    ReplyDelete
  2. खूपच छान विचार आहेत.असेच नवनवीन विचारांची देवाणघेवाण या ब्लॉगद्वारे करावी.

    ReplyDelete